आय व्ही एफ उपचार घेत असताना काय करावे आणि काय करू नये

आय व्ही एफ उपचार घेत असताना काय करावे आणि काय करू नये

हल्ली काही जोडप्यांना वेगवेगळ्या कारणास्तव संतती राहण्याबाबत अडचण निर्माण होते अशावेळी आय व्ही एफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) उपचार अनेक दांपत्यांसाठी उपयुक्त असतो. आय व्ही एफ प्रक्रियमध्ये विविध गोष्टींचा विचार करावा लागतो, ज्यामुळे उपचार अधिक यशस्वी होऊ शकतात. आजच्या ब्लॉगमध्ये आय व्ही एफ उपचार घेत असताना काय करावे आणि काय करू नये ते पाहूया.

आय व्ही एफ म्हणजे काय ?

– आय व्ही एफ उपचारामध्ये महिलेचे स्त्री बीज हे त्या महिलेच्या जोडीदाराच्या शुक्राणू मार्फत फलित केले जातात व भ्रूण तयार केले जाते. त्यानंतर तयार झालेले भ्रूण तिच्या गर्भाशयामध्ये पुढील वाढीसाठी रोपित केले जातात. या प्रक्रियेला आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) म्हणतात.

आय व्ही एफ कधी केले जाऊ शकते ?

  • स्पष्ट न होणारे वंध्यत्व
  • पुरुषांमधील काही अडचणी
  • अवरोधित फॅलोपियन ट्युब्स
  • इंडोमेट्रीओसिस
  • पुरुषांमध्ये शुक्राणूची कमी संख्या असणे किंवा शुक्राणूची गुणवत्ता चांगली नसणे.
  • स्त्रियांमध्ये स्त्री बीजांची कमी संख्या असणे किंवा गुणवत्ता चांगली नसणे.
  • गर्भाशयामध्ये ट्यूमर असणे.
  • नैसर्गिक रित्या गर्भधारणा न राहिल्यास
  • इंट्रायूटेरिन  इनसेमिनेशन अयशस्वी झाल्यास
  • इतर वैद्यकीय स्थिती, वंधत्वाचा कालावधी तसेच जोडप्याचे वय या सर्व गोष्टींचा विचार करून डॉक्टर आय व्ही एफ करण्याचा निर्णय देऊ शकतात.

आय व्ही एफ उपचार घेत असताना काय करावे :

– सर्वप्रथम योग्य हॉस्पिटलची निवड करा : आय व्ही एफ करण्याचा निर्णय घेत असताना हॉस्पिटलची योग्य निवड खूप महत्त्वपूर्ण ठरते. कारण हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले तज्ञ डॉक्टर तसेच इतर कर्मचारी वर्ग यांच्याशी चांगले संबंध/संवाद असणे खूप आवश्यक आहे कारण त्यामुळे आय व्ही एफ प्रक्रियेमध्ये हे सर्व मार्गदर्शक ठरू शकतात. तसेच आय व्ही एफ उपचारासाठी त्या हॉस्पिटलमध्ये काय उपकरणे आहेत तसेच किती खर्च येऊ शकतो ही सर्व माहिती मिळवावी.म्हणूनच हॉस्पिटल संबंधित सर्व माहिती घेऊनच हॉस्पिटलची निवड करावी.

– डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा: डॉक्टरांच्या सर्व सूचनांचे व्यवस्थितरित्या पालन करणे आवश्यक आहे. ते तुम्हाला औषधांचे वेळापत्रक तसेच इतर सर्व प्रक्रिया व्यवस्थितरित्या समजावून सांगतील. तुम्हाला काही प्रश्न असल्यास डॉक्टरांना विचारू शकतात.

– आरोग्यदायी आहार घ्यावा: आय व्ही एफ प्रक्रियेमध्ये व्यवस्थित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे.ताज्या फळे, भाज्या, प्रोटीन अशा सर्व गोष्टींचा समावेश आहारामध्ये करावा.

– व्यायाम: डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम करू शकता तसेच मानसिकता कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम करू शकता.

– मानसिक आरोग्याची काळजी घ्या : शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचे असते.मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, मेडिटेशन किंवा तज्ञाची मदत वेळोवेळी घेऊ शकता. तसेच आपले कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींशी सुद्धा संवाद साधू शकता.

– आय व्ही एफ बद्दल संपूर्ण माहिती मिळवा : आय व्ही एफ प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांची माहिती डॉक्टरांकडून मिळवा. आय व्ही एफ बद्दल सर्व माहिती असल्याने सर्व प्रक्रियेसाठी आपण मनाने आणि शरीराने सुद्धा तयार असू.

– पुरेसे पाणी प्या: शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.

– ताण तणाव कमी करण्यासाठी उपाय : काही महिलांना  आय व्ही एफ प्रक्रियेमध्ये ताण तणाव निर्माण होऊ शकतो अशावेळी ताणतणाव न घेता ,निराश न राहता ,आशावादी असावे आणि एखादा छंद असल्यास तो छंद जोपासावा आणि लक्ष तिकडे विचलित करावे.

आय व्ही एफ उपचार घेत असताना काय करू नये:

– तंबाखू आणि मद्यपान करणे टाळावे: तंबाखू, मद्यपान आणि इतर कुठल्याही प्रकारचा नशा करू नये. यामुळे गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून आय व्ही एफ यशस्वी करण्यासाठी तसेच शरीरास नुकसान होऊ नये यासाठी तंबाखू आणि मद्यपान करणे टाळावे.

– जास्त ताण घेऊ नये : ताण टाळण्याचा प्रयत्न करा. अधिक ताण घेणे गर्भधारणेसाठी प्रतिकूल ठरू शकतो. त्यामुळे संपूर्ण आय व्ही एफ प्रक्रियेमध्ये आशावादी असणे तसेच सकारात्मक असणे महत्त्वपूर्ण आहे.

– औषधे : कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी.

– कठीण व्यायाम करणे टाळावे: जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणे टाळावे तसेच कठोर शारीरिक ऍक्टिव्हिटीज करणे सुद्धा टाळाव्यात, यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो आणि गर्भधारणेस अडचण येऊ शकते तसेच गर्भधारणा झाली असल्यास सुद्धा अडचण येऊ शकते त्यामुळे कठीण व्यायाम करणे टाळावे.

– सोशल मीडियाचा अति वापर करू नये : काही व्यक्तींवर गर्भधारणेशी संबंधित बातम्या किंवा नकारात्मक माहिती सोशल मीडियावरून मिळाल्यास गर्भधारणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळावा.

Visit Inamdar IVF Fertility Center For The Best IVF Treatment in Pune

आय व्ही एफ उपचार घेत असताना काळजीपूर्वक वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य आहार, मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित असणे आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.आय व्ही एफ उपचार घेत असताना काय करावे आणि काय करू नये हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघितले याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होऊ शकतो. गर्भधारणे संबंधी किंवा आय व्ही एफ बद्दल काही शंका असल्यास इनामदार आय व्ही एफ सेंटर येथे संपर्क साधू शकता.

Leave a comment

Call Now Button